सिल्लोड, (प्रतिनिधी) : सहकार महर्षी माणिकराव पालोदकर महाविद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचे जयंतीचे अवचित्त साधून भाषण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक अशा तीन गटांमध्ये या स्पर्धा पार पडल्या. तर ८० हून अधिक विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग नोंदवत मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेमध्ये भाषणे करून उपस्थितांची मने जिंकली. त्या स्पर्धेतील विजेते प्राथमिक गटातून प्रथम डिंपल हिन्मिरे, द्वितीय निकिता
पालोदकर, तृतीय रवी सपकाळ, माध्यमिक गटातून प्रथम शिवानी लोखंडे, दुतीय त्रिष्णा भांमरे, तृतीय प्रांजल तुपे, उत्तेजनार्थ अर्शया शेख, उच्च माध्यमिक गटातून प्रथम दुर्गा जाधव, द्वितीय कांचन सपकाळ या विद्यार्थिनींनी क्रमांक मिळविला.
या स्पर्धेसाठी परीक्षकाचे कार्य महाविद्यालयातील शिक्षक भास्कर केरले, जयश्री चापे, महादेवी ठवरे, डॉ. गणेश दिवटे, डॉ. रमेश काळे यांनी पाहिले. प्रा. एकनाथ जंजाळ यांनी यांनी भाषणासाठी आवश्यक असा आत्मविश्वास, वक्तृत्व कौशल्य व विचारांना योग्य दिशा देण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले. प्राचार्य ज्ञानेश्वर काकडे म्हणाले की, चांगला वक्ता होण्यासाठी भाषण करताना स्पष्ट उच्चार, आवाजातील चढ-उतार, आशय आणि एकूण सादरीकरण यावरती लक्ष द्यायला हवं. सूत्रसंचालन प्रतीक्षा गव्हाणे, सलोनी दांडगे या विद्यार्थिनींनी केले. प्रदीप कानडजे यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील शिक्षक दिलीप जाधव, कृष्णा भांडारे, सुनील तांबे, सुनील सागरे, प्रफुल्ल कळम, योगेश निंभोरे, गजानन सपकाळ, संजय जाधव, संतुकराव मोरे, अक्षय निकम यांनी परिश्रम घेतले.











